चोरट्यांना पकडण्यासाठी पोलीस लावत आहेत ’एडी चोटी का जोर’तरीही एटीएम चोर सापडेना

Foto
औरंगाबाद:  गेल्या १३ आणि १४ जुलै रोजी चोरट्यांनी शहरातील दोन एटीएम  लक्ष केले होते. या घटनेला दोन आठवडे उलटले आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांचे पथक जिल्ह्या बाहेर, राज्याबाहेर जाऊन आले मात्र पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. 

१३ जुलै रोजी पहाटे चोरट्यानी बिडबायपास रस्त्यावरील एसबीआय बँकेचे अख्खे एटीएम पाळविल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या एटीएम मशीन मध्ये सुमारे २५ लाख रुपयांची रोकड होती या घटनेला २४ तास उलटत नाहीत तर पुन्हा पडेगाव भागातील मिसबाह कॉलनीत असलेल्या एसबीआय च्याच एटीएमला लक्ष्य करण्यात आले. कटर च्या साहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या चोरट्याना नागरिकांनी पिटाळून लावले होते. या दोन घटनांनी औरंगाबादेत एटीएम सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. हे चोरटे आद्यप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पोलिसांचे एक पथक बुलढाणा,अंबाजोगाई या ठिकाणी जाऊन आले तेथून काही संशयितांना देखील पोलिसांनी उचलले होते मात्र चौकशीअंती  त्यांना सोडण्यात आले.तर एक पथक हैद्राबाद ला देखील जाऊन आले.

 मात्र पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही, या गंभीर प्रकरणाचा तपास पुंडलीकनगर पोलिसांसह गुन्हेशाखा आणि सायबर सेल देखील करीत आहे. कुठलाही सुगावा मिळत नसल्याने सध्या हे प्रकरण ब्लाइंड आहे.या मुळे गुन्हे शाखा आणि पुंडलीकनगर पोलीस आता सायबर सेल च्या मदतीने डंम डाटा तपासत आहे, पोलिसांना अशा आहे की ’डंमडाटा’ च्या मदतीने  आरोपीचे काहीतरी धागेदोरे हाती लागतील. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ’एडी चोटी का जोर’ लावत आहे. मात्र घटनेच्या दोन आठवड्यानंतर पोलिसांच्या हाती काहीच नाही ही वस्तूस्थिती आहे.

ही टोळी परराज्यातील?
बीड बायपास वरील एसबीआय बँकेचे एटीएम पळविणार्‍या टोळीची पध्दत ही हरियाणा ,यूपी सारख्या राज्यात वापरली जाते. त्यामुळे  एटीएम पळविणारी टोळी ही महाराष्ट्राबाहेरील असण्याची शक्यता आहे.आम्ही सर्व शक्यतांची पडताळणी करीत आहोत.
- घनश्याम सोनवणे
स.पो.नि पुंडलीकनगर पो. स्टे

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker